जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात जी कथित मशीद आहे तो हिंदूंचा पांडववाडा (Pandav Wada) आहे. मात्र त्यात मुसलमानांनी अतिक्रमण करून तिथे मशीद बांधली आहे. त्या मशिदीच्या चाव्या नागरपरिषदेकडे द्या आणि तिथे हिंदूंनाही प्रवेश द्या, असा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल या दिवशी हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना ‘स्थानिक नगरपरिषद सकाळचा नमाज चालू होण्याच्या काही वेळ आधी पांडववाडा (Pandav Wada) येथील प्रवेशद्वार उघडण्यासाठी एका अधिकार्याची नियुक्ती करील. हा अधिकारी नमाज अदा होईपर्यंत ते उघडे ठेवेल. यासमवेतच मंदिरे किंवा स्मारक येथून प्रवेश किंवा बाहेर पडण्यासाठी कोणतेही निर्बंध नसतील आणि सर्व धर्मांच्या लोकांना कोणत्याही त्रासाविना भेट देण्याची अनुमती असेल’, असे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन् यांनी म्हटले आहे. ‘मशिदीच्या जागेच्या संदर्भात यथास्थिती कायम राहील आणि पुढील आदेश येईपर्यंत ती वक्फ बोर्ड किंवा याचिकाकर्ता सोसायटीच्या नियंत्रणाखाली राहील’, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या वेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन् यांच्या खंडपिठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जुम्मा मशीद ट्रस्ट समितीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
पांडववाड्याचे प्रकरण काय आहे?
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरात असलेल्या पांडववाड्याविषयी (Pandav Wada) असे सांगितले जाते की, पांडवांनी वनवासाची काही वर्षे एरंडोल परिसरात घालवली होती. येथे बांधलेल्या हिंदु आणि जैन मंदिरांसारख्या वास्तू ८०० ते १ हजार वर्षे जुन्या आहेत. हिंदूंच्या गंभीर उदासीनतेमुळे १२५ वर्षांपूर्वी मुसलमानांनी हळूहळू येथे अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला आणि ती ‘वक्फ’ मालमत्ता म्हणून घोषित करून तेथे मशीद बांधली. हिंदु जनजागृती समिती आणि पांडववाडा (Pandav Wada) संघर्ष समिती यांसारखे हिंदु गट ‘वक्फ मंडळा’च्या घुसखोरीतून पांडववाड्याला मुक्त करण्यासाठी धडपडत होते. वादग्रस्त मशिदीच्या अस्तित्वाच्या नोंदी किमान १०० वर्षांपूर्वीच्या आहेत. हिंदूंचे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. हिंदु धर्मग्रंथातही या मंदिराचा उल्लेख आहे. स्थानिक लोककथा आणि ग्रंथ यांमध्ये वर्णन केल्यानुसार वक्फ समिती ही पांडववाड्याची हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी विवादित मशीद बांधण्याचे काम करत होती.
Join Our WhatsApp Community