गोव्यातील हिंदूंच्या धर्मांतरणाला लागला ब्रेक! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

155

गोवा राज्यातील हिंदूंचे धर्मांतरण पूर्णपणे थांबल्याचा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येत होते. पण आपल्या सरकारने केवळ 100 दिवसांच्या आत या धर्मांतरणावर बंदी घातल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. बुधवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

धर्मांतरणाला बसला चाप

गोव्यात आमच्या सरकारने हिंदूंच्या धर्मांतराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या धर्मांतरणाच्या घटना घडत होत्या, त्या आम्ही थांबवल्या आहेत. तसेच गोव्यातील बेकायदेशीर भूसंपादन प्रकरणांच्या चौकशीसाठी गोवा सरकारने एसआयटीची देखील स्थापना केली आहे, असे प्रमोद सावंत यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचाः सोसायट्यांना मोठा दिलासा! शिंदे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय)

जनतेला केले होते आवाहन

याआधीही प्रमोद सावंत यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरुन राज्यातील जनतेला सावध केले होते. गरीब, संख्येने कमी, मागास किंवा अन्न व नोकरीपासून वंचित असलेल्या लोकांना धर्मांतरणाच्या दिशेने नेण्यात येत आहे. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यात येत आहे. पण कोणीही याला बळी पडून चुकूनही धर्मांतरण करता कामा नये, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले होते.

मार्चमध्ये पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात बहुमत प्रस्थापित केले होते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत विराजमान झाले आहेत.

(हेही वाचाः ‘ते आमचे जुने सहकारी’, शिंदे गटातील आमदारांबाबत राऊतांची भाषा नरमली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.