गोव्यात राजकीय भूकंप; विरोधी पक्षनेत्यासह 8 आमदार पक्ष सोडणार?

99

गोव्यात काॅंग्रेसला मोठा झटका लागणार आहे. काॅंग्रेसच्या 11 आमदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजेच 8 आमदार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुस-यांदा काॅंग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काॅंग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काॅंग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. भाजपात सामील होणा-या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिंगबर कामत हे काॅंग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.

( हेही वाचा: औरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना धक्का, सत्तारांच्या आदेशाला दिली स्थगिती )

भाजप आमदार फोडत असल्याचा काॅंग्रेसचा दावा

जुलै महिन्यात गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जुलै महिन्यातच काॅंग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. भाजप काॅंग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.