Godhra Book : हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेली पाठ्यपुस्तके राजस्थान सरकारने घेतली मागे!

43
Godhra Book : हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेली पाठ्यपुस्तके राजस्थान सरकारने घेतली मागे!
Godhra Book : हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेली पाठ्यपुस्तके राजस्थान सरकारने घेतली मागे!

राजस्थानमध्ये (Rajasthan) भाजपाच्या (BJP) आधी असलेल्या गहलोत सरकारने म्हणजेच काँग्रेस (Congress) पक्षाच्या सरकारने अदृश्य लोग-उम्मीद और साहस की कहानियाँ या नावाचं पुस्तक (Godhra Book) राजस्थानच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं होतं. या पाठ्यपुस्तकांमध्ये गोध्रा प्रकरणाचा उल्लेख आहे. तसंच या प्रकरणात हिंदू आरोपी होते असा उल्लेख आहे. असा उल्लेख असणारी सगळी पुस्तकं राज्य सरकारने मागे घेतली आहेत. तसंच हे पुस्तक शाळांनी खरेदी करु नये असेही निर्देश दिले आहेत. हे पुस्तकच शालेय अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Godhra Book)

… म्हणुन पुस्तक मागे घेण्याचा निर्णय
राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर म्हणाले की, “या पुस्तकात गोध्राकांडाबाबत (Godhra Book) खोटी माहिती देण्यात आली आहे. तसंच दोन समाजांमध्ये फूट कशी पडेल याची हेतुपुरस्सर काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकात गोध्रा ट्रेन ज्यांनी पेटवली त्यांची बाजू योग्य होती असाही उल्लेख आहे. तसंच हिंदूंची बाजू ही गुन्हेगारांप्रमाणे मांडण्यात आली आहे. गोध्रा प्रकरण घडलं तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी बसले होते. नरेंद्र मोदी यांचीही बदनामी या पुस्तकात करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.” असं ते म्हणाले. (Godhra Book)

नेमकं काय आहे पुस्तकात?
माजी IAS अधिकारी हर्ष मंदर (Harsh Mandar) यांनी हे पुस्तक ( Godhra Book ) लिहिलं आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश या ठिकाणी हर्ष मंदर हे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका एनजीओमध्ये काम करत होते. मंदर यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांचे अनुभव लिहिले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की गोध्रा ट्रेनवर झालेला हल्ला हा दहशतवादी कट होता. या कटातून मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवर खूप अत्याचार करण्यात आले. अनेक मुलंही बेपत्ता झाली आहेत. तर दुसऱ्या धर्माचे लोक ओळख लपवून जगत आहेत असाही उल्लेख या पुस्तकात आहे. (Godhra Book)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.