जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री पाणी घेऊन धावल्या तेव्हा… पहा व्हिडिओ

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक उत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून कायमंच कौतुक होत आलं आहे. त्यांच्या शांत आणि नावाप्रमाणेच निर्मळ स्वभावामुळे एक चांगली व्यक्ती म्हणूनही सर्वसामांन्यांच्या मनात त्यांनी एक अढळस्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या याच माणुसकीचं दर्शन एका व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा घडलं आहे.

सोशल मीडियावर सीतारामन यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंचावरील महिला अधिका-याला त्या चक्क पाणी देताना दिसत आहेत, त्यांच्या या कृतीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

(हेही वाचाः उद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा)

काय आहे व्हिडिओत?

शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)च्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू या व्यासपीठावर भाषण करत होत्या. भाषणादरम्यान मध्येच थांबत त्यांनी तिथल्या एका कर्मचा-याकडून पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली. पण कर्मचारी पाणी घेऊन येण्याआधीच स्वतः निर्मला सीतारामन या पाण्याची बाटली घेऊन त्यांच्यापाशी धावल्या आणि त्यांनी चंदुरू यांना ग्लासात पाणी ओतून दिले, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(हेही वाचाः राऊत म्हणतात, मुंबई आमच्या बापाची)

टाळ्यांचा कडकडाट आणि कौतुक

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा व्हिडिओ शेअर करत निर्मला सीतारामन यांच्या कृतीची वाहवा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांचे कौतुक केले, तर चंदुरू यांनी भारावून जात सीतारामन यांचे मनापासून आभार मानले. सीतारामन यांनी शनिवारी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी एनएसडीएलचा गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम ‘बाजार का एकलव्य’लाँच केला. याच कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here