उत्तम कायदा आणि सुव्यवस्था ही विकासाची पहिली अट आहे. त्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गृह मंत्रालयाने देशातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी बदल घडवले. उत्तराखंडमधील डेहराडून येथे ४९ व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान कॉंग्रेसला प्रमुख पाहुणे म्हणून (Amit Shah) अमित शाह यांनी संबोधित केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, अलीकडेच भारत सरकारने संसदेत तीन नवीन विधेयके सादर केली आहेत जी सध्या गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे विचाराधीन आहेत. शाह म्हणाले की, आता हे तीन नवे कायदे पारित झाल्यानंतर देशातील जनतेला न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबापासून दिलासा मिळेल . ते म्हणाले की, तीन नवीन फौजदारी कायद्यांमध्ये दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी परिभाषित करून मोदी सरकारने देशाचे रक्षण करण्याचे काम केले आहे.
(हेही वाचा – Women Empowerment : महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; आणली नवी योजना)
अमित शाह (Amit Shah) पुढे म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि आगामी काळात एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून तो उदयाला येईल, अशा परिस्थितीत आपल्या आर्थिक संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारीही देशभरातील पोलीस आणि यंत्रणांना अधिक भक्कमपणे पार पाडावी लागेल.
Addressed the DGPs and senior police officials at the inaugural session of the ’49th All India Police Science Congress’ in Uttarakhand.
The three proposed criminal laws will lead our legal system to a new era in the Amrit Kaal.
Time has arrived to uproot terrorism adopting… pic.twitter.com/X2nruGmuyJ— Amit Shah (@AmitShah) October 7, 2023
ते म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात विकास होतो, तेव्हा अनेक आव्हानेही आपल्यासमोर उभी राहतात आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांना स्वत:ला सज्ज राहावे लागेल. देशाच्या गंभीर पायाभूत सुविधांची सुरक्षा, राज्यांमधील सायबर सुरक्षेचा लेखा जोखा, सोशल मीडिया आणि व्हिसावर सातत्यपूर्ण देखरेख यासारख्या नवीन विषयांकडे देशातील युवा पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे (Amit Shah) अमित शाह म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community