पेपर फुटीची लिंक आरोग्यमंत्र्यांपर्यंत?

आरोग्य विभागाच्या पदभरतीत वसुलीचा घोडे बाजार!

99

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून, त्यांच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसुलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा कायम राखता आली पाहिजे, आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

पेपर फुटीची लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचली

होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट आता मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहचल्या आहेत. म्हणजेच या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का?, असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेत उपस्थित होत आहे. आरोग्यमंत्र्यांचा व घोटाळेबाजांचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळले पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली, तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

(हेही वाचा बापरे! आता क्रिप्टोची देवाणघेवाण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.