सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात घमासान सुरु झाले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आता अडचणीत आले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीय हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप केला आहे.
राज्य तरी कशाला चालवता?
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डेटा जमा करा, हे केंद्र सरकारला सांगितले नाही. प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी, असे वाटत असेल, तर मग राज्य कशाला चालवत आहात, असा सवालही त्यांनी केला. तुम्हाला काम करता येत नसेल आणि रोज उठून केंद्राकडे बोट दाखवत असाल, तर राज्य केंद्राकडे देऊन टाका, असेही पडळकर यांनी म्हटले.
पवार कुटुंब आरक्षण विरोधी
( हेही वाचा :सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय नेमबाजीत महाराष्ट्राच्या ‘या’ कन्येला सुवर्ण! )
Join Our WhatsApp Community