राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात एसटी कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. त्यानंतर राज्यभर एसटी कामगार आंदोलनात उतरला आणि राज्यभरातील एसटी वाहतूक बंद पडली, मात्र काही दिवसानंतर सरकारसोबतच्या बैठकीत समाधान झाल्याचे सांगत या दोघांनी आंदोलनातून बाहेर निघणे पसंत केले. मात्र पुढे हे आंदोलन ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे रेटले आणि तब्बल ६ महिने एसटी बंद होती. आता पडळकर आणि खोत हे पुन्हा एसटी कामगारांना घेऊन आंदोलन करणार आहेत, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतिश मेटकरी यांनी दिली.
कुठे करणार आंदोलन?
एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात गेला, म्हणून त्यावेळी ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांना पागारवाढ करण्यासह इतर अनेक मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आमदार पडळकर आणि माजी आमदार खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली होती, परंतु मान्य झालेल्या मागण्यांमधील अनेक मागण्यांची अंमबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. सरकार भाजपचे असूनही भाजपचेच आमदार हे आंदोलन करणार आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान 20 डिसेंबरपासून हे पडळकर-खोत आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी पत्र लिहून सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे.
(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)
Join Our WhatsApp Community