अनियमित वेतन समस्येला कंटाळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी बेमुदत संप सुरु केला आहे. तरीही राज्य सरकार एसटी कामगारांचे म्हणणे काय आहे. हे जाणून घेत नाही. उलट त्यांना निलंबित करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, १० नोव्हेंबरपासून महामंडळाच्या कामगारांना कुटुंबकबिला घेऊन मंत्रालयात या, मंत्रालयाच्या दारात संसार थाटण्याचे आवाहन केले आहे.
दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही #मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही.
#एसटी_कर्मचाऱ्यांनो
आता एकच निर्धार 10 नोव्हेंबरपासुन मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार.
आता #आत्महत्येचं पाऊल कुणीही उचलू नका.कारण आता लढायचंय आणि लढण्यासाठीचं जगायचंय.. #CMOMaharashtra#BJPMaharashtra #MSRTC pic.twitter.com/mwHMOm2r7J— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 5, 2021
काय म्हटले पडळकर यांनी?
२८ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तरी अबोला सुटेना. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांपैकी मागील काही दिवसात मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन जणांचे प्राण देवाच्या कृपने वाचले. २८ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, तरी तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणे तर सोडा. साधे दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरवश्यावर आपले राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे, हाच यांचा मराठी बाणा आहे. १० नोव्हेंबरला मंत्रालयाबाहेर संसार थाटू, ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावरतीच आणायचे असतील, तर मी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. चला आपला संसार आपल्या पोरा-बाळांसहीत येत्या १० नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू, हे आंदोलन लोकशाही मार्गाने लढू आणि जिंकूही. पण, या आंदोलनाला कोणतही गालबोट लागता कामा नये, याची काळजी आपण सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यायची आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
(हेही वाचा : केंद्राने केले आता राज्याने ‘करून दाखवावे’!)