‘चांगले राजकारणी असले, तरीही एसटी कर्मचाऱ्यांबाबत तुच्छ राजकारण नको’

114

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, ७ व्या वेतन आयोगानुसार पगार द्यावा तसेच थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे. अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी कामबंद आंदोलन करत आहेत. या संपावर राज्य सरकारकडून अद्यापही तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांबाबत असे तुच्छ पद्धतीचे राजकारण आपण करू नका. अशा, खोचक शब्दात भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले पडळकर ?

माननीय परिवहन मंत्री अनिल परब यांना मला सांगायचे आहे की, आपण खुप चांगले राजकारणी आहात. पण एसटी कर्मचाऱ्यांबाबत असे तुच्छ पद्धतीचे राजकारण आपण करू नये. कारण आपल्या असंवदेनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहे. तरीही आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खाची जाणीव होत नाही. ३ हजार कर्मचारी कामावर परतले अशा खोट्या बातम्या आपण वृत्तपत्रात पसरवत आहात आणि कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून उद्रेक घडवत आहात. असा, आरोप पडळकरांनी अनिल परब यांच्यावर केला आहे.

( हेही वाचा : मरोळवासीयांना द्या हक्काचे उद्यान: भाजपची स्वाक्षरी मोहीम)

…तर जबाबदारी तुमची

खोट्या बातम्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या फूट पडली व याचे रुपांतर हिंसाचारामध्ये किंवा आत्महत्येमध्ये झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहिल. असा इशारा देत पडळकर म्हणाले, आपणास विनंती आहे की संवेदनशीलता पाळा व लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या. कृपया कुठल्याही पद्धतीचे तुच्छ राजकारण करू नये. असा सल्लाही त्यांनी अनिल परब यांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.