नुसत्या बैठका नकोत, निर्णय घ्या! एसटीचा संप सुरूच राहणार!

140

मागील १४ दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप सुरू आहे. त्यावर राज्य सरकारकडून तोडगा काढला जात नाही. केवळ बैठका सुरू आहे. शरद पवारांना परिवहन मंत्री अनिल परब भेटतात, परिवहन मंत्री परब राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांशी चर्चा करतात, आता शरद पवार आणि मंत्री अनिल परब पुन्हा भेटतात. अशा प्रकारे बैठकांचे सत्र सुरू आहे, पण निर्णय होत नाही. त्यामुळे यावर अंतिम निर्णय घ्या. जोवर एसटीचे विलीनीकरण होत नाही, तोवर संप सुरूच राहणार आहे, अशी भूमिका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली.

काय म्हणाले पडळकर?

  • भाजपाने एसटी कामगारांना नादाला लावले म्हणता, ते काय लहान मुले आहेत का? त्यांना त्यांचे भले कशात आहे, हे समजते.
  • आजवर ज्या कामगार संघटनांच्या भरवशावर कामगार राहिले, त्यांनी त्यांची फसवणूक केली, त्यामुळे त्यांनी आता सगळ्या कामगार संघटनांचा नाद सोडला आहे.
  • आम्ही आजही चर्चेवरच विश्वास ठेवतो. चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. पण त्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन चर्चेला यावे, सरकार तसे करत नाही, उलट कामगारांशी चर्चेचे नाटक करते. त्यांची भूमिका सरकार जाणून घेते आणि त्यावर दुसरी रणनीती ठरवते.

(हेही वाचा एसटीवर पवारांसोबत बैठक, तरीही तोडगा नाहीच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.