कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याची विकृती थांबवा!

आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणेंचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल, असे आमदार पडळकर म्हणाले. 

76

माननीय संजय राऊत, कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील, असा इशारा भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिला.

राणेंचा फुगा गुपितांनी भरलेला!

आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणेंचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई-बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…?, अशा शब्दांत भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा : राणे मंत्रिमंडळातील थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’! शिवसेनेचा पुन्हा हल्लाबोल)

बाळासाहेबांच्या सामनाचे  दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर

 ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्याने महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे  दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.