वडेट्टीवारांची ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’! एमपीएससी परीक्षेवरून पडळकरांचा हल्लाबोल 

विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे, असे पडळकर म्हणाले.

75

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीच्या चाळणी परीक्षेची तारीख घोषित केली. ती अवघ्या २ दिवसानंतर अर्थात १३ सप्टेंबर घेण्याचे ठरवले. इतक्या कमी वेळेत विद्यार्थी परीक्षेला कसे येणार? यावरून वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या ‘महाज्योती’ संस्थेला  ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, असा घणाघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

काय म्हणाले पडळकर? 

अति सन्मानीय विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे. काल कुठलीही पूर्वसुचना न देता १३ सप्टेंबरला अचानकपणे युपीएससी चाळणी परीक्षेचे आयोजन केले आहे. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? युपीएससीचे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची १० ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. मी या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की, चाळणी परिक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशा चर्चा करून पुर्ननियोजित केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही आमदार गोपीचंद  पडळकर यांनी दिला आहे.

(हेही वाचा : ‘लालबागचा राजा’च्या दरबारी पोलिसांची पत्रकारांवर दंडुकेशाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.