संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक…मराठी माणसे वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस का?, असा प्रश्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
वारकऱ्यांचा शाप, तळतळाट भोगावा लागणार!
महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम ३७०चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़शाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे, असे आमदार पडळकर म्हणाले.
(हेही वाचा : राणीबागेत पेंग्विनवरील खर्च पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठीच! मनसेचा आरोप)
‘पेंग्वीन‘ विकासाचे मॉडेल नाकारले
आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्वीन‘ विकासाचा मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की, तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता, अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटला आहे आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आला आहे, असा हल्ला पडळकर यांनी केला.
Join Our WhatsApp Community