‘राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar ) गटाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत’, अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. तसेच शरद पवारांसमोर (Sharad Pawar ) अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे नेमके कोण होते, असा सवाल ही पडळकरांनी पवारांना विचारला आहे.
पुढे ते म्हणाले की, आपल्या आयुष्यात दोन वेळा रायगडावर जाणारे शरद पवार यांच्या समोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या घोषणाबाजी करणारे कोण होते त्यांची चौकशी करण्यात यायला हवी, अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली आहे. तसेच धनगर समाजाचे शरद पवारांनी (Sharad Pawar ) वाटोळे केले असल्याचा हल्लाबोल ही पडळकरांनी केला.
दरम्यान आदिवासी संघटना पडळकरांवर आक्रमक झाल्या आहेत. धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न काही प्रशासकीय अधिकारी करत आहेत. मात्र आदिवासी विरोधात पडळकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको करत आंदोलन केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community