राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मारकडवाडी गावाला भेट दिली. याच मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी त्यांच्यावर टीका केली. हम करे सो कायदा यासारखं शरद पवार वागत आहेत. शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का? हे आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत, असे म्हणत पडळकरांनी (Gopichand Padalkar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा-“…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल
“शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका”, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणुकांतील आकडेवारी मांडली आणि काही उदाहरणे समोर ठेवली. तसेच पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे ट्विट एक्सवर शेअर करत विरोधकांना टोला लगावला. (Gopichand Padalkar)
दरम्यान, यापूर्वी झारखंड, कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर मतदान झाले. आता प्रियंका गांधी जिंकल्या आहेत. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा खरा म्हणजे दुटप्पीपणा आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? विरोधी पक्षाकडे आता कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. सर्व घटकांनी राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली आहे. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. विरोधी पक्षाला माझे आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणे बंद करा आणि विकास गाणे सुरू करा, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले. (Gopichand Padalkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community