सध्या राज्यात कंत्राटी भरती या मुद्द्यावरून बरंच राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
कंत्राटी भरतीवरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता. त्यांचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच फाडून टाकला आहे, कंत्राटी भरतीचा जीआर महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता, शरद पवारांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या सहीने तसेच काँग्रेसच्या मदतीने हा जीआर काढला होता, त्यांचं पितळ आता सर्व उघडं पडलं आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.
(हेही वाचा –
मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार
शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार हे महाराष्ट्रात फिरून विद्यार्थ्यांमध्ये विष कालवत होते, त्यांचा तोही बुरखा फाडून त्यांना फडणवीसांनी चपराक लावल्याची टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. गोपीचंद पडळकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे, ओबीसी आरक्षण सध्या 16 टक्के आहे. जर पुन्हा मराठा समाजाला या ओबीसीमधून आरक्षण दिलं तर मराठा समाजाला काय मिळणार आहे असे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community