‘काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’ पडळकरांचे टीकास्त्र

221

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे मागील सरकारच्या काळात मराठा समाजाच्या तरुणांना SEBC प्रवर्गातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात हा निर्णय रद्द करण्यात आला. यावरून गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

( हेही वाचा : “मराठी माणसाला डिवचू नका!” राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा)

काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही

मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने EWS चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पडळकरांचे टीकास्त्र

काका पुतण्याचं हे दुखः आहे की, मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली म्हणून यांच्या पोटात कळा उठत आहेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरत आहेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचंय हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा आहेत असेही पडळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.