विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर कोर्टात जा. लोकांच्यात बाजार मांडून साध्य काय करणार आहात ? उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे 50 लोकं निघून गेले, तुम्ही बहुमत चाचणीला थांबले नाहीत, तुम्ही आधीच पळून गेलात , असा टोला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – Kurla-Ghatkopar : डोंगरावरील झोपड्यांसह कुर्ला, घाटकोपरमधील पाणी पुरवठ्यात होणार सुधारणा)
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काही राहिले नाही
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचा देखील निकाल लागणार आहे, काय लागेल पाहू ? अजित पवारांनी (Ajit Pawar) नंतर प्रयोग केला आहे. फार अभ्यास करून केला असेल. जे शिंदेंनी केले, त्यापेक्षा जास्त अभ्यास अजित पवारांनी केला असेल. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिले नाही, त्यामुळे असे सात-आठ महिने असेच होत रहाणार आहे. लोकांची दिशाभूल होत रहाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपवाल्यांना शिवसेनेला मतदान केले होते आणि तुम्ही लोकांची दिशाभूल केली.
बारामतीमध्ये आमच्या विचाराचा खासदार होणार
गोपीचंद पडळकर यांनी या वेळी बारामतीच्या राजकारणाविषयीही मोठे भाष्य केले. ते म्हणाले, ”बारामतीमध्ये आमच्या विचाराचा खासदार होणार हे एक लाख टक्के खरे आहे. तो भाग्यवान कोण असेल, मला माहीत नाही. बारामतीमध्ये भाजप चांगले काम करत होते, त्यामुळेच अजित पवारांना इकडे यावे लागले”, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
(हेही वाचा – Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप)
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको
गोपीचंद पडळकर मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयीही (OBC reservation) बोलले. ‘मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळाले पाहिजे. ओबीसीमधून द्यायला आमचा विरोध आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागेल’, अशी आशा पडळकर यांनी व्यक्त केली आहे. (Gopichand Padalkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community