बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत राज्य सरकारने एक महिन्याची मुदत घेतली होती. एक महिन्याच्या आता बैलगाडा शर्यती चालू होईल असे सांगितले होते. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि ती झाली नाही, तर बैलगाडा मालकांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा करू आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवू आणि सरकार विरोधात संघर्ष सुरु करू, असा इशारा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
महिनाभरापूर्वी पडळकरांनी घेतलेली शर्यत!
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी याकरता राज्य शासनाकडून सरवोचच न्यायालयात अपेक्षित युक्तीवाद होत नाही, असे कारण देत आमदार पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात भल्या पहाटे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा विरोध डावलून या शर्यतीचे आयोजन झाले होते. त्यानंतर लगेचच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांनी बैठक घेतली. आणि राज्यातील बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. यासाठी बैलांचा सराव आणि शर्यत पुर्ववत सुरू करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते. मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलले होते. संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडा शर्यत सुरू आहे, त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले होते. आता ही मुदत येत्या २४ सप्टेंबर रोजी संपणार आहे, त्यानंतरही शर्यत सुरु झाली नाही, तर पुन्हा संघर्ष सुरु करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.
(हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमित शहांना भेटणार! पुन्हा होणार बंद दाराआड चर्चा?)
Join Our WhatsApp Community