लॉकडाऊनमध्ये ऊर्जा मंत्र्यांचे प्रताप, खाजगी कामासाठी वापरला सरकारी विमान प्रवास खर्च!

वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणला आपल्या मंत्र्यांच्या खाजगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे, हे आश्चर्यजनक आहे.

139

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊन काळात बेकायदा पद्धतीने खाजगी कामासाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी, भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली. सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम ४०६,४०९ अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्याचेही पाठक यांनी सांगितले.

काय म्हणाले पाठक

लॉकडाऊन काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १२ जून, २ जुलै, ६ जुलै रोजी मुंबई-नागपूर, ९ जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली असा विमान प्रवास केल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून ‘महानिर्मिती’ने  मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खाजगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणला आपल्या मंत्र्यांच्या खाजगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे, हे आश्चर्यजनक आहे.

(हेही वाचाः फडणवीसांनी त्यांच्याकडील सीडीआरची माहिती तपास यंत्रणांना द्यावी! सचिन सावंतांची मागणी)

गुन्हा दाखल करण्याची मागणी

ऊर्जा मंत्री राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत हा विमान प्रवास केला असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी पाठक यांनी केली. यावेळी विश्वास पाठक यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील देणारी कागदपत्रे व राऊत यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत सादर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.