विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) आचारसंहिता लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त (Governor appointed MLA) आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १२ रिक्त जागांपैकी ७ फक्त जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी १५ ऑक्टोबर रोजी पार पडला. दरम्यान, १२ पैकी ७ आमदारांना नियुक्ती करण्यास स्थगिती द्यावी यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT Group) नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगितीस नकार दिला. मात्र, या नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे या सात आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. (Governor appointed MLA)
राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून भाजपा (BJP) ३ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती किंवा राज्य सरकारनेही आमदारांची नियुक्ती न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले नव्हते. त्यामुळे आम्ही १२ पैकी सात आमदारांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये कोणताही अडथळा नव्हता, असे राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ (Advocate General Birendra Saraf) यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी सात सदस्यांचा शपथविधी सोहळा झाला. (Governor appointed MLA)
(हेही वाचा – BMC : महापालिकेला आता हवाय पैसा; छत्रपती शिवाजी महाराज मार्केटसह वरळी आणि मलबार हिलमधील जागा ‘लिज’वर देणार)
भाजपाकडून महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पाहा –