Governor Appointed MLC : राज्यपालनियुक्त १२ आमदारांसाठीचा फॉर्म्युला ठरला?

110

महाविकास आघाडीच्या काळापासून रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या महायुतीमध्ये फॉर्म्युला (Governor Appointed MLC) ठरवण्यावर चर्चा सुरु झाली आहे. याआधी १२ आमदारांपैकी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये ४-४-४ असा फॉर्म्युला ठरला होता, पण आता त्यात बदल झाल्याचे समजते.

शिवसेनेचे  माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याविषयी माहिती देताना नव्या फॉर्म्युलानुसार भाजपा ६ आणि शिवसेना राष्ट्रवादीला ३-३ असा फॉर्म्युला ठरवला जात असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाकडून सांगण्यात आलेला आहे की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (Governor Appointed MLC) विषयांमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही. तो महाराष्ट्र शासनाचा विषय आहे सरकारचा विषय सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषय मार्गी लागेल अशी शक्यता बळावली आहे, असे रघुवंशी यांनी सांगितले.

(हेही वाचा पनवेलमध्ये CIDCOचा भोंगळ कारभार; पूल अर्धवट बांधून ठेवला; नागरिकांची गैरसोय सुरूच)

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मी गुरुवारी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये (Governor Appointed MLC) संधी देणार, असे वचन मला दिले होते. त्या यादीत माझे नाव होते, पण ज्यावेळी उठाव झाला. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.