राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून खितपत पडलेले आहे. या प्रकरणी सोमवार, ३१ जुलै रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीत एक याचिका नव्याने दाखल केली आहे. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 21 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे, या कालावधीत सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा, असे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांनी म्हटले आहे. जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रकरण उच्च न्यायालयात आले आहे.
(हेही वाचा Sanjay Raut : शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊतांची नाराजी; म्हणाले ‘संभ्रम निर्माण करू नका’)
या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Join Our WhatsApp Community