राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

गेल्या दोन दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना  मुंबईतील गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सव्वा ९ वाजेच्या दरम्यान, त्यांनी गिरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

(हेही वाचा – ‘ठाकरे सरकार’चं टेन्शन वाढवणारी एकनाथ शिंदेंची ३ मोठी विधानं)

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र आता राज्यपाल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, असेही सांगितले जात होते की, आज बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे विशेष विमानाने मुंबईत दाखल होणार आहेत. यावेळी ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार होते. मात्र आता राज्यपाल रूग्णालयात दाखल झाल्याने शिंदेंची भेट त्यांच्याशी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here