महाराष्ट्रातून मी निघून गेल्यास राज्याचेच नुकसान! सांगलीत राज्यपालांची फटकेबाजी 

दीपाली भोसले-सय्यद ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांच्या मुलींना मदत प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थितीत राहिले होते.

कायम दुष्काळात राहणारा महाराष्ट्र मी आल्यावर बघा कसा भरपूर पाऊस, पूर अनुभवत आहे, मी राज्यातून निघून गेलो, तर महाराष्ट्राचेच नुकसान आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत तुफान फटकेबाजी केली. निमित्त होते दीपाली भोसले-सय्यद ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांच्या मुलींना मदत प्रदान कार्यक्रमाचे! या कार्यक्रमात राज्यपालांनी दिलखुलास फटकेबाजी केली. त्यावेळी राज्यपालांच्या मिश्कील राजकीय कोट्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.

तुमची इच्छा म्हणून मी परत जाणार नाही!

सांगलीत झालेल्या या कार्यक्रमात महविकास आघाडी सरकारमधील आघाडीचे मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील उपस्थितीत होते. त्यामुळे राज्यपालांनी मंत्री पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली. नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटे असलेल्या भागातून मी आलो आहे. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असायची, पण मी आल्यापासून येथेही पाऊस सुरू झाला आहे, पूर येतोय, मी गेल्यास नुकसान होईल. आता काय नुकसान होत आहे का, अशी विचारणा जरी जयंत पाटील यांची इच्छा तरी मी लगेच परत जाईन, असे नाही, असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. दोन पाटलांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील) मध्ये बसण्याची संधी मिळाली. दीपाली भोसले-सय्यद यांच्या कामाबद्दल सरकारने सत्कार करावा, यामुळे आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. अनेकांकडे पैसे आहेत, सगळेच माझ्यासारखे गरीब नाहीत!, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

(हेही वाचा : शरद पवार म्हणतात, ‘काँग्रेस रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार!’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here