गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेत आहे. काही दिवसांपासून भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी एक खळबळजनक वक्तव्य केले. ज्या विधानावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काय घडला प्रकार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषणासाठी उभे राहिले. मात्र भाषण सुरू होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारींचे भाषण थांबवत त्यांना ‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असे सांगितले. या घडल्या प्रकाराला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो ।’ असे वक्तव्य केले आहे.
(हेही वाचा – बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला ‘मनसे’चा विरोध? काय म्हणाले वसंत मोरे)
महिलेने ही तक्रार केल्यानंतर त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्या महिलेला मिश्किलपणे प्रश्न विचारले तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचे आहे. हा प्रश्न विचारताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा अशी मागणी एकीकडे सुरू असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मी राज्यपाल आहे, असे मानत नसल्याचे म्हटले आहे.
आपल्या भाषणात पुढे राज्यपाल त्या महिलेला म्हणाले की, ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ,’ कोश्यारींचे भाषण सुरू असताना त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकार रेकॉर्डिंग करत उभे होते. त्यांच्या मागे ती महिला बसली होती. या छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे या महिलेने राज्यपालांना दुसऱ्या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंतीही केली होती. या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते विविध उद्योजकांना पुरस्काराने गौरविण्यात कारण्यात आले. पुण्यातील विमाननगर परिसरात एका कार्यक्रमात भाषण करताना राज्यपालांनी हे विधान केले आहे.
Join Our WhatsApp Community