राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती यादी संदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 आमदारांच्या यादीतून आता राजकीय लोकांची नावे वगळण्यात येणार आहेत. यानंतर येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना नवी यादी पाठवणार असल्याचे देखील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
कोणाची नावे वगळण्यात येणार?
एकनाथ खडसे, राजू शेट्टी, सचिन सावंत यासह आदी नेत्यांची नावे वगळण्यात येणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या निर्णयानुसार राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या यादीतून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या यादीतील नावे राज्यपालांकडे पाठवली होती परंतु अद्याप राज्यपालांनी या नावांवर कोणताच निर्णय घेतलेला नाही.
(हेही वाचा – Manappuram Finance वर रिझर्व्ह बँकेची कारवाई, १७ ठोठावला लाखांचा दंड! )
राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारे पत्र बनावट
राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सुचवली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही नाव सूचवली आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना जी नावे सुचवली आहेत. ते सर्वजण सामाजिक क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे वर्षभरानंतर राज्यपालांकडून 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालाकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्याची वर्णी लावण्यासाठी स्वतःहून सहा नावे सुचवल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारे हे पत्र बनावट असल्याच म्हटले जात आहे.
राजभवनाकडून खुलासा
राजभवनातून या पत्राबाबतचा खुलासा करण्यात आला असून हे पत्र बनावट असल्याचे सांगण्यात आत आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कोणतीही नावं सूचवली नाही. ते पत्र बनावट आहे, अस राजभवनाने म्हटल आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातून त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पत्रात नेमके काय?
राज्यपाल कोश्यारी याचं पत्र अचानक व्हायरल झाले. 12 आमदारांच्या नियुक्तीपूर्वी राज्यपालांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज्यापालांनी सहा सदस्यांच्या नावाची शिफारस केली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद – सदस्य निवडी बाबतचे हे पत्र आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी ही नावे घ्यावीत, असे राज्यपालांनी या पत्रात म्हटले आहे.