प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
(हेही वाचा-Ratan Tata No More : टाटा समुहाला आधुनिकतेचा साज चढवणारा द्रष्टा)
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सी पी राधाकृष्णन म्हणाले, “जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे श्री रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित केले.” (Ratan Tata Death)
I am deeply saddened by the demise of our beloved Ratan Tata Ji, a great Nationalist & a visionary industrialist who brought immense pride to our Bharat through his exceptional work and tremendous achievements.
His vision and humane leadership led the Tata Group to achieve… pic.twitter.com/UlCYCGYYHj
— CP Radhakrishnan (@CPRGuv) October 9, 2024
“१४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन टाटा समूहाने आपल्या उत्पादन व सेवेच्या माध्यामातून स्पर्शले, याचे श्रेय जसे टाटा समूहाचे आहे, तसेच ते रतन टाटा यांच्या व्यापक दृष्टीचे देखील आहे. अनेक क्षेत्रात नीती मूल्यांशी तडजोड होत असताना देखील रतन टाटा यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत भारतीय नीतीमूल्यांची कसोशीने जपणूक केली. रतन टाटा हे खर्या अर्थाने भारतीय उद्योग क्षेत्राचे ‘विवेक रक्षक’ होते. बृहत विश्व समाजाच्या शाश्वत कल्याणाचा विचार करणारे ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.” (Ratan Tata Death)
(हेही वाचा-Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्र्यांची माहिती)
“विकसित भारताचे उद्दिष्ट प्राप्त करताना त्यांनी प्रस्थापित केलेल्या विश्वास, उत्कृष्टता व नाविन्यता या मूल्यांचा प्रत्येक क्षेत्रात अंगीकार करणे, हीच टाटा त्यांना सच्ची श्रद्धांजली ठरेल.” असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. (Ratan Tata Death)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community