Governor Ramesh Bais : प्रभू राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतु

आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केल्यामुळे लोक धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने देश भ्रमण करु लागले तसेच तेथील भाषा, बोली, संस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेला, असे सांगून 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे असे राज्यपालांनी सांगितले.

218
Governor Ramesh Bais : प्रभू राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतु

महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू राम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी केले आहे. उभय राज्यातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपालांनी सांगितले.

(हेही वाचा – PM Narendra Modi and Emmanuel Macron : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरला पोहोचणार)

राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२४) महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत यावर्षी प्रथमच महाराष्ट्र राजभवनात ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य लढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान –

महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्षे काशी हे अध्ययन केंद्र होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते. उत्तर प्रदेशाने देशाला पंतप्रधान दिले आहेत तसेच कला, संस्कृती, साहित्य, रंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तित्व दिले आहेत. महाराष्ट्र तसेच मुंबईच्या सामाजिक व आर्थिक विकासात उत्तर प्रदेशच्या लोकांचे मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले.

(हेही वाचा – Rohan Bopanna ४३ व्या वर्षी दुहेरीत अव्वल)

उत्तर प्रदेशचा विकास झाला तर देशाचा विकास होईल –

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. त्यामुळे पंतप्रधानांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे असे नमूद करून, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी तसेच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पाहावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस सुरु करण्यात माजी राज्यपाल राम नाईक यांचे योगदान महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले.

(हेही वाचा – War Games in Arabian Sea : अरबी समुद्रात भारतासह 50 देशांचे नौदल; चीनला आव्हान)

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ : देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न

आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केल्यामुळे लोक धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने देश भ्रमण करु लागले तसेच तेथील भाषा, बोली, संस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेला, असे सांगून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.