राज्यपाल-ठाकरे सरकारमधील वाद मिटता मिटेना!

दुपारी ४ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम होते, असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

94

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील वाद मिटवण्याचे नाव घेत नाही. मागील वर्षभरापासून १२ आमदारांच्या नियुक्तीच्या वादाचा अंक अजून संपलेला नाही. आता तर राज्यपालांनी भेट दिली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असल्याची चर्चा सकाळपासूनच वाहिन्यांवर रंगली होती. मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पण आता ही भेट रद्द होण्याचे खापर पुन्हा एकदा राज्यपालांवर फोडण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सज्ज झाले आहेत.

वेळ घेतलीच नव्हती

या सर्व गोंधळानंतर राज्यपालांची वेळच घेतली नसल्याची माहिती देण्यात येत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत राज्य सरकारकडून राजभनवाकडे वेळ मागण्यात आली नव्हती. तर दुपारी ४ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम होते, असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा : राड्यानंतर राजकारण जोरात, पण शिवसेनेचे ‘ते’ नेते कुठे दिसेनात)

नानांचा काय आहे आरोप?

विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपमध्ये फूट पडेल अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी इतके दिवस आमदारांची नियुक्ती रखडून ठेवली आहे. आज राज्य सरकारकडून राजभवनाकडे वेळ मागण्यात आली होती. मात्र, त्यांनी वेळच दिली नाही असे पटोले यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून विचारण्यात आली होती की आम्हाला वेळ देण्यात यावी. त्यांनी ‘कळवतो’, असे सांगितले पण कळवण्यात आले आहे.

विधान परिषदेसाठी या नावांची शिफारस !

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.