राज्यभरात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गोविंदाना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळेल अशी घोषणा केली या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ सेफ्टी फिचर; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित )
MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही
एमपीएससी (MPSC) च्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ न देता गोविंदाना ५ टक्के क्रिडा आरक्षणात देऊ भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषददेत ही माहिती दिली. ते म्हणाले, कोणत्याही एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही हे खात्रीने सांगतो. ५ टक्के क्रिडा विभागाचे जे आरक्षण आहे त्यात सुद्धा सुरूवातीच्या क्रिडा प्रकारांवर अन्याय होणार नाही पण या ५ टक्क्यांच्या आरक्षणात भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे. यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोणत्याही सरकारला वाटलं नाही की या पारंपरिक सणाला दर्जा द्याला याची खंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काही लोक म्हणाले, गोविंदांचे थर लावणारे अशिक्षित असतात त्यामुळे अशिक्षित लोकांना कशाप्रकारे क्रायटेरिया लावून तुम्ही नोकरी देणार असा प्रश्न उपस्थित केला. अशिक्षित म्हणून हिणवणे कितपत योग्य आहे. ही मुलं सहा महिने व्यायाम शाळेत जाऊन सराव करतात म्हणून हा दहीदंडी साहसी खेळ म्हणून जाहीर केला. गेल्या २० वर्षांपासून मागणी होत आहे परंतु कोणत्याही सरकारला वाटलं नाही की या पारंपरिक सणाला दर्जा द्यावा अशी खंतही उदय सामंत यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community