Pratap Sarnaik : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) (वय ३६) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले आणि नंतर पसार झाला. या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात, महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी. महामंळाची बैठक (ST. Corporation meeting) पार पडली. या बैठकीनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही (CCTV) आणि जीपीएस (GPS) यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. (Pratap Sarnaik)
सर्व एसटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस अनिवार्य
मंत्रालयात एसटी महामंडाळाची बैठक पार पडली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले की, “आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये. लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की, तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एसटी प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही आजच्या बैठकीत सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर पुढील काळात एसटी बसेस आणि स्थानकांवर एआयचा वापरही करण्यात येणार आहे.”
🗓 २७ फेब्रुवारी २०२५ l 📍मुंबई
महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालय येथे पार पडली. एस.टी प्रवासात ५०% सवलत दिल्यापासून महिलांची एस.टी प्रवाशांची संख्या वाढली असून त्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात… pic.twitter.com/MLWs78fWmx
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) February 27, 2025
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न)
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस अनिवार्य करणार
- सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार
- सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार
- परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय
- एसटी आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल पर्यंत हटवण्यात येणार
- शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल
- बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार
(हेही वाचा – Heatwave : राज्यात फेब्रुवारीमध्येच उष्णतेची लाट ! IMD चा अंदाज काय?)
आरोपी अद्यापही फरार
पुण्यातील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (३७) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकांची स्थापना केली आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेपासून तो फरार आहे. याचबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी पीटीआयला दिली आहे.
हेही पाहा –