पैठण शिंदेंचेच! 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

89

बीड जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळपासूनच ९ वाजता मजमोजणीस सुरूवात झाली. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीचा समावेश असून ३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. दरम्यान, पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणक्यात विजय झाला आहे. अपेगाव, खर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यात बंडखोरीनंतर शिंदे गटाने झेंडा फडकवला असून शिंदे गटाने ग्रामपंचायतीवर देखील आपले वर्चस्व राखले आहे.

(हेही वाचा – Dahi Handi 2022 : गोविंदांसाठी ‘मनसे’चं चिलखत, तर ‘भाजप’चं सुरक्षा कवच!)

बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो ती कायमच चर्चेत राहते. अंबाजोगाई तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीचा समावेश असून ३ ग्रामपंचायची भाजपच्या ताब्यात आहेत. पंकजा मुंडेंच्या बालेकिल्यात यंदाही या ३ ग्रामपंचायती भाजपाच्याच ताब्यात राहणार की राष्ट्रवादी वरचढ ठरणार हे काही मिनिटांमध्येच स्पष्ट होणार आहे. पंरतु अंबाजोगाईच्या या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचाच नजरा लागल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.