Gram Panchayat Elections 2023 : राज्यात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींत मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

158
Gram Panchayat Elections 2023 : राज्यात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींत मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यभर 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज म्हणजेच रविवार ५ नोव्हेंबर रोजी (Gram Panchayat Elections 2023) मतदान होत आहे. 2 हजार 950 सदस्य पदे आणि 130 सरपंचाच्या रिक्त पदांसाठीही ही पोटनिवडणूक होत आहे. मतदान सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत होणार असून सोमवार ६ नोव्हेंबर रोजी याची मतमोजणी होणार आहे. परंतु गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावित भागात मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 3:00 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तर 7 नोव्हेंबर 2023 रोजी गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावित भागात मतमोजणी होणार आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुका (Gram Panchayat Elections 2023) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक विशेष महत्वाची आहे. उद्याच्या मतमोजणीमधून राज्यातील जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द)

राज्यातील 2353 ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat Elections 2023) एकूण 20,572 जागा आहेत. या सर्व 2353 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय 2068 ग्रामपंचायतींमधील रिक्त 2950 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. रिक्त असलेल्या 130 सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे 23 हजार जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानासाठी सुरुवात झाली आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर बीडमध्ये आज प्रत्यक्ष मतदान, बूथवर तगडा पोलिस बंदोबस्त

बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections 2023) आज, रविवारी सकाळी 7:30 ते संध्या 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी संवेदनशील बूथवर तगडा पोलिस बंदोबस्त दिला आहे. यात 1600 अधिकारी, कर्माचारी आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 158 ग्रामपंचायती निवडणुकीसाठी 531 उमेदवार, तर 3 हजार 236 सदस्य रिंगणामध्ये आहेत. यासाठी 2 लाख 86 हजार 409 मतदार असून 561 मतदान केंद्रे आहेत. 186 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात बिनविरोध 11 तर 16 ग्रामपंचायतमध्ये मतदानावर बहिष्कार आहे. (Gram Panchayat Elections 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.