ग्रामपंचायत निकाल; आघाडी बेकायदेशीर तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना हेच कायदेशीर सरकार

174

७,७५१ ग्रामपंचायतीचे निकाल आता समोर आले आहेत. २,७७० ग्रामपंचायतींवर युतीने विजय मिळवला तर २,५९० ग्रामपंचायती आघाडीकडे आल्या आहेत. आघाडी म्हणजे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि ठाकरे गट. युती म्हणजे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना. एकीकडे दोन पक्ष त्यात शिंदेंचा अगदी नवखा पक्ष आणि दुसरीकडे तीन मोठे पक्ष अशी लढत झाली आणि शिंदे-फडणवीसांनी बाजी मारली. त्यात शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा मिळाल्या.

ठाकरे गटाला मोठा फटका पडू शकतो

या ग्रामपंचायतीच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि ठाकरे गट महत्वाच्या पक्षांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर गेला आहे. आता मुंबई आणि उपनगरांची निवडणूक बाकी आहे. मुंबईतल्या नगरसेवकांनी अजूनही उठाव केलेला नाही. परंतु पालिकेची निवडणूक जवळ आल्यावर मात्र चित्र बदललेले दिसेल. कारण मागच्या निवडणुकीत भाजपने कांटे की टक्कर दिली होती. यावेळी भाजप आणखी तयारीने उतरेल. आता तर शिंदेंनी पक्षच ताब्यात घेतल्यामुळे देखील ठाकरे गटाला मोठा फटका पडू शकतो.

(हेही वाचा विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, भीक, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे! विधानसभेत खडाजंगी)

पुन्हा नव्याने युतीचं सरकार आलं

आता मुद्दा असा की शिंदे-फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडले आणि शिंदे सरकार आलं. हे युतीचं सरकार स्थापन झाल्यावर ठाकरे गटाकडून हे बेकायदेशीर सरकार आहे असं म्हटलं गेलं. परंतु खरं पाहता जनतेने युतीला मते दिली होती आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडीचं सरकार निर्माण केलं गेलं. परंतु हे सरकार पडल्यानंतर पुन्हा नव्याने युतीचं सरकार आलं तेव्हा या सरकारवर विरोधकांनी टीका केली. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार लवकरच पडणार आहे. परंतु जनता जनार्दन असते. जनतेने मतपेटीतून विरोधकांना उत्तर दिलं आहे की शिंदे-फणडवीस, भाजप-बाळासाहेबांची शिवसेना हेच कायदेशीर सरकार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.