उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर अग्रेसिव्ह हिंदुत्वाची भूमिका बाजूला सारत त्यांनी सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं असल्याचं नेहमीच दिसून येत आहे. याचाच फायदा उचलत शिवसेना शिंदे गट देखील आपल्या ॲग्रोवन हिंदुत्वाचा झेंडा समोर घेऊन ठाकरे गटाची मते आपल्या बाजूला सारून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच फायदा भाजपाला देखील व्हावा म्हणून भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) देखील हिंदुत्वाचा चेहरा बनवून समोर येत आहेत.
मनसे नेत्यांनी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन
मागील काही दिवसांपासून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये सामील असलेले पक्ष विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काहीसा अस्वस्थ दिसून येत आहे. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर हिंदुत्ववादी शिंदे गट आणि मनसेनं थेट मुस्लिमांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं उघड झालं. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना बुरखे वाटले. तर दुसरीकडे हिंदू जननायक असं बिरुदावली मिरवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांनी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेचं आयोजन केलं.
उद्धव ठाकरे गटानं विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे की काय आता महायुतीतल्या पक्षांनी चांगलाच धसका घेतल्य़ाची चर्चा रंगलीय. आणि म्हणूनच मतांसाठी भूमिका बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय.
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा भूमिका घेतल्यामुळे महायुती असलेले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट देखील चिंतेत पडले आहे. मुस्लिम बहुल मतदान असणाऱ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये लोकसभेप्रमाणे दलित आणि मुस्लिम मतांचा फटका बसू शकतो याची प्रचिती लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आल्यामुळेच आता महायुतीतील घटक पक्ष बुरखा वाटप तर कुठे अजमेर यात्रा घडवून आणत आहेत.
Join Our WhatsApp Community