पालकमंत्र्यांनी खड्ड्यांच्या तक्रारींकडे महापालिकेचे वेधले लक्ष!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणासह मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे तसेच शहरातील विविध कामांचा आढावा महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडून घेतला.

118

मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे जनता त्रस्त असून नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचीही दखल महापालिका प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेवून ते बुजवण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे पर्यावरणमंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला देत खड्ड्यांच्या तक्रारींकडे त्यांनी बोट दाखवून दिले.

खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणासह मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे तसेच शहरातील विविध कामांचा आढावा महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडून घेतला. यावेळी त्यांनी खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, पी.वेलरासू, सुरेश काकाणी, डॉ. संजीव कुमार, उपायुक्त राजन तळकर, अजय राठोर आदी उपस्थित होते.

New Project 1

(हेही वाचा : सेना, काँग्रेस नेत्यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! काय आहे गौडबंगाल?)

आदित्य ठाकरेंनी या केल्या सूचना! 

या आढावा बैठकीच्या प्रारंभी मुंबईतील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सादर केली. माहिती जाणून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बिगर शासकीय संस्थांमार्फत तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, तसेच ज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, मात्र त्यांनी घेतलेला नाही, अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावी, शिवाय दोन डोस घेतले असले, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतात, अशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.