पालकमंत्र्यांना नकोय महापालिका आयुक्तपदी चहल

133

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या विरोधातील नाराजी आता उघड होऊ लागली असून चक्क शहराचे पालकमंत्री यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे चहल यांची उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे. एकाबाजुला बाळासाहेबांची शिवसेना आयुक्त तथा प्रशासकांना बाजुला करण्याची मागणी करत असले तरी भाजप मात्र चहल यांना बाजुला करण्यास तयार नाहीत. त्यामुळे केसरकर हे आयुक्तांवर प्रचंड नाराज असूनही मुख्यमंत्रीही आपल्या पालकमंत्र्यांचे ऐकत नसल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : साखर सम्राटांना दणका : यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला शासन हमी नाही!)

मुंबईतील सौदर्यीकरणाच्या ५०० प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्यावर शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. शहराचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून महापालिका आयुक्त हे केसरकर यांना योग्यप्रकारचे सहकार्य करत नसल्याची त्यांची तक्रार होती. पालकमंत्री म्हणून दिपक केसरकर यांनी महापालिका मुख्यालयात तीन वेळा बैठका आयोजित केल्या, त्यातील दोन बैठकांना स्वत: आयुक्त हे गैरहजर होते. एकदा राज्याचे मुख्य सचिव आणि एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कोळीवाड्यांच्या प्रश्नावर आयोजित बैठकांना उपस्थित राहण्याकरता आयुक्त हे निघून गेल्याने केसरकर यांच्या समवेतच्या बैठकांना उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे तेव्हापासून असलेली नाराजी आता दिवसेंदिवस वाढत जात असून गणेश गौरव स्पर्धेतील विजेत्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याची कल्पनाही न दिल्याने केसरकर हे नाराज झाले होते.

पण ही नाराजी वाढत जात असताना मागील सोमवारी गेट वे ऑफ इडियाजवळ झालेल्या मुंबई सौदर्यीकरणाच्या ५०० प्रकल्पांच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमाचे योग्यप्रकारे नियोजन न केल्याने ही नाराजी अधिक वाढली गेली. त्यामुळे केसरकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार करून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केल्याचीही माहिती मिळत आहे. एकाबाजुला केसरकर यांना सहकार्य न करणाऱ्या आयुक्तांकडून उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या चांगल्याप्रकारे सहकार्य केले जात आहे. त्यामुळेच केसरकर हे अधिक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.