राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. (Guardian Minister )
( हेही वाचा : Saif Ali Khan हल्ल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला अटक)
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. त्याशिवाय हसन मुश्रीफ यांना वाशिम, गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद शंभुराजे देसाई यांना देण्यात आले आहेत. (Guardian Minister )
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याबरोबरच बीड जिल्ह्याचीही जबाबदारी सोपवली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे पवार यांचा प्रभाव वाढला आहे. तथापि, संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री म्हणून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राजकीय वर्तमाने आणि जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्यांवरून चांगलीच चर्चा रंगली असून, पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार असतील. सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला, आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी, तसेच नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट असतील. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच कोल्हापूरच्या सहपालकमंत्रीपदी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मेघना बोर्डीकर यांना देण्यात आले आहे. राजकीय वर्तमाने आणि जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या बद्दल चर्चेची रंगत चांगलीच वाढली असून, आता आगामी निवडणुकांमध्ये या सर्व पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेची चाचणी होईल.
वाचा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community