चंद्रकांत पाटील यांनी १००० मुलींचे स्वीकारले पालकत्व

102

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील एक हजार मुलींचे पालकत्व घेत, ‘सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत दरमहा शंभर रुपये योगदान देणार असल्याची घोषणा केली. पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘आमदार जनसंवाद’ उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत वस्ती आणि सोसायटी मधील नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.

बुधवारी कोथरुड मतदारसंघातील सागर कॉलनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या मुलींना योजनेचे पासबुक वाटप केले. यावेळी ते बोलत होते.

लग्नाच्या वेळी व्याजासह ठेव मिळणार परत

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोकहितार्थ निर्णय घेऊन, अनेक योजना राबवल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींचे शिक्षण आणि पुढील जीवनमान सुसह्य व्हावे; यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात खाते उघडण्यात येत आहे. खाते उघडल्यानंतर २१ वर्षांपर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करायचे असल्यास व्याजासह ठेव परत मिळते.

( हेही वाचा राजद्रोह कायद्याला तूर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )

१००० मुलींचे पालकत्व घेत; त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावू

पाटील पुढे म्हणाले की, सध्या माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत कोथरूड मतदारसंघातील मुलींची नोंदणी सुरू असून, मुलींचे खाते उघडण्यासाठी २५० रुपये ही भरले जात आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणून या योजनेत मुलीचे नाव नोंदणी झालेल्या कुटुंबाने दरमहा किमान १०० रुपये द्यावेत. अतिरिक्त १०० रुपये लोकसहभागातून देऊन किमान १००० मुलींचे पालकत्व घेत; त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावू. यामुळे प्रत्येकी २०० रुपये भरल्याने २१ व्या वर्षी व्याजासह त्या मुलींना १ लाख २ हजार ७६ रुपये मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.