यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक भागात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
( हेही वाचा : दिल्लीसह उत्तरभारतात भूकंपाचा धक्का! ६.६ रिश्टर स्केल तीव्रता; केंद्र अफगाणिस्तान )
नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात
“मी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. मी गेली अनेक वर्ष या शोभायात्रांमध्ये न चुकता सहभागी होतो आहे परंतु यावर्षी मुख्यमंत्री म्हणून या शोभायात्रेत सहभागी होण्याचा मला आनंद आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपीनेश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली. यावेळी कोपीनेश्वर मंदिरातून परंपरागत निघणारी पालखी खांद्यावर घेत त्यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री नववर्षानिमित्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागत यात्रेत सहभागी झाले. तसेच या स्वागत यात्रेतील पालखीवर त्यांच्या हस्ते पुष्पवृष्टी देखील करण्यात अली. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त ठाणेकरांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि नववर्षाचा काय संकल्प केला हे सुद्धा सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा नववर्षाचा संकल्प
जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी नववर्षात काय संकल्प केला हे सुद्धा सांगितले. सरकारचा नव्या वर्षाचा संकल्प आपण अर्थसंकल्पात पाहिलेला आहे. या राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम या अर्थसंकल्पातून केले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूणाई अशा सर्वांचा आपण विचार केला आहे असे मुख्यमंत्री यावेळी सांगितले. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community