Video: पंतप्रधान मोदींच्या आईबाबत ‘आप’च्या नेत्याने केलं आक्षेपार्ह विधान; भाजप आक्रमक

140

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी भाजप आणि आप या पक्षांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. आपचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी केलेल्या विधानाचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली असल्याचे दिसतेय. भाजपचे अमित मालविय आणि स्मृती इराणी यांच्यासह इतर नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यांनी गोपाल इटालिया यांचा हा व्हिडिओ शेअर केला असून आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – फाटकी अन् मळकी जीन्स तब्बल १४२ वर्षांनी विकली, किंमत ऐकून व्हाल थक्क! ‘या’ जीन्समध्ये आहे तरी काय?)

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यात गोपाल इटालिया यांचा हा तिसरा आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने इटालिया यांना समन्स पाठवला आहे. तर दिल्ली पोलिसांनी बुधवारी इटालिया यांना यासंदर्भात काही वेळासाठी ताब्यातही घेतले होते.

या व्हिडिओवरून भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांना काही थेट प्रश्न विचारत थेट निशाणा साधला आहे. केजरीवाल तुमच्या आशीर्वादामुळे अभद्र भाषा बोलणाऱ्या गोपाल इटालिया यांनी हिराबा यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. मी काही नाराजी व्यक्त करणार नाही. गुजराती किती नाराज आहेत. हेही मला दाखवायचे नाही. पण लक्षात ठेवा तुमचा पक्ष निवडणुकीत समाप्त होईल, आणि आता जनताच न्याय करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.