गुजरात निवडणुकीत भाजपचाच असणार डंका, १८२ जागा जिंकणार

80

यंदाही गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच डंका कायम असणार आहे. एक्झिट पोलमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. त्यातील ९९ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. काँग्रेसला ७७ जागा जिंकण्यात यश मिळवले. मात्र यंदा काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

एक्झिट पोल काय सांगते आकडेवारी?

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला १३१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ४१ जागांवर यश मिळू शकते. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला ६ जागांवर यश मिळू शकेल. गुजरातमध्ये भाजपने २००२ मध्ये १२७ जागा जिंकल्या होत्या. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने नोंदवलेला हा विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे. आज तक-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला १३१ ते १५१ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ ते ३० जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष ९ ते २१ जागांवर यश मिळवू शकतो. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेसच्या पडझडीचा फायदा भाजपला झाला आहे. अनेक ठिकाणी आपने काँग्रेसला धक्का देण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये ३३ जिल्हे आहेत. गेल्या निवडणुकीत पटेलांच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसला. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी या तरुणांच्या आंदोलनाचा मोठा परिणाम भाजपला सहन करावा लागला. मात्र यंदा पटेल आंदोलनाचा मुद्दा नाही. त्यातच आपने गुजरातमध्ये जोर लावला. त्याचा एकूण परिणाम काँग्रेसच्या कामगिरीवर झाला.

(हेही वाचा मुसलमान कुटुंबावर धर्मांतर विरोधी कायद्याचा उगारला बडगा, हिंदू तरुणीचे जबरदस्तीने केले धर्मांतर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.