मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील नागरिकांचे आभार व्यक्त करतो. गुजरातने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवे, असे मी जनतेला सांगितले होते. गुजरातच्या जनतेने तसेच केले. गुजरातमधील दणदणीत विजयाचा जल्लोष दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील भाजपच्या मुख्यालयात उपस्थित होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
हिमाचल प्रदेशच्या निकालांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ‘हिमाचलमध्ये इतक्या कमी फरकाने निकाल कधीच आले नाहीत. आमचा 1 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला. आम्ही हिमाचलशी संबंधित मुद्दे मांडत राहू.’ मी जनतेसमोर नतमस्तक आहे. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज आपल्याला मिळत आहे. जिथे भाजप जिंकू शकला नाही. गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, त्याची चाचपणी करून विश्वास दाखवला आहे. जात, वर्ग, समाज आणि सर्व प्रकारच्या भेदांच्या वर उठून भाजपला मतदान केले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
(हेही वाचा Gujarat Assembly Election 2022 : भाजपने मोडला काँग्रेसचा ३७ वर्षांचा रेकॉर्ड)
Join Our WhatsApp Community