संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान पार पडले. गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणावर प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, काॅंग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीच्या आकड्यांवरुन, नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून, पुन्हा एकदा सत्ता भाजपच्या हाती येणार. भाजप आपला 2000 मधील 127 जागांचा रेकाॅर्ड मोडण्याची शक्यता आहे.
भाजप आघाडीवर
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काॅंग्रेस 26 तर आप तीन जागांवर आघाडीवर आहे.
या पाच मुद्द्यांकडे भाजपाचे लक्ष
गुजरातमधील जनता पुन्हा भाजपला संधी देणार की नव्या पक्षाचे सरकार आणायचे यासंबंधी लवकरच निर्णय येणार आहेत.
- पाटीदार मत
- पक्षांतर करणारे उमेदवार
- डिच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या जागा
- पंतप्रधान मोदींनी प्रचार केलेल मतदारसंघ
- विकास