पक्षाविरोधात निवडणूक लढवणा-या 12 बंडखोरांना भाजपचा दणका; सहा वर्षांसाठी केले निलंबित

गुजरातमध्ये पक्षाविरोधात बंड करणा-या आमदारांवर भाजपने कारवाई केली आहे. भाजपने आपल्या 12 आमदारांवर ही कारवाई केली आहे. पक्षाने 12 बंडखोर नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने या बंडखोर आमदारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते.

सहा वर्षांसाठी निलंबित

गुजरात विधासभा निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे.  त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या 12 नेत्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी याप्रकरणी सांगितले की, पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आमदारांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

( हेही वाचा: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबईकडे येणा-या प्रवाशांचे हाल, ‘या’ गाड्या उशिराने )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here