गुजरातमध्ये कुणाची येणार सत्ता? जाणून घ्या ओपिनियन पोल…

सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेससह आम आदमी पक्षही सर्व ताकदीनिशी उतरला आहे. त्यामुळे येथील निवडणूक भाजपाला तितकी सोपी नाही, म्हणूनच गुजरातमध्ये भाजपाने फौज उतरवली आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. अशा परिस्थितीत या निवडणुकीचा पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे. इंडिया टीव्ही आणि मॅट्रिझ यांचा हा पोल आहे. ज्यामध्ये भाजपाला बहुमत मिळेल असे म्हटले आहे, मात्र आम आदमी पक्ष यात भाजपा आणि काँग्रेसला चांगलेच बेजार करेल, असेही यात दिसत आहे.

२०१७मध्ये काय स्थिती होती? 

गुजरातची निवडणूक जाहीर होताच भाजपाने १५० ची लक्ष्य जाहीर केले आहे. या ठिकाणी एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. मात्र पोलच्या नुसार या ठिकाणी भाजपाला १०४ ते ११९ जागा मिळतील, असे म्हटले आहे, तर काँग्रेसला ५३ ते ६८ जागा मिळतील आणि आम आदमी पक्षाला ० ते ६ जागा जिंकता येतील, असे म्हटले आहे. २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागांवर विजय मिळाला होता. इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये या जागांमध्ये वाढ होत असल्याचे संकेत आहेत. मात्र, या जागा पक्षाच्या नेतृत्वाकडून होत असलेल्या दाव्याच्या आसपासदेखील नाहीत. तर, विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत ७७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपाला ४९.५ टक्के, काँग्रेसला ३९.१ टक्के आणि आम आदमी पक्षाला ८.४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष, इतरांना ८.६५ टक्के मते मिळाली होती. ओपिनियन पोलमध्ये यंदाच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत फारसा बदल झाला नसला तरी जागांच्याबाबतीत मोठा बदल दिसून आला आहे.

(हेही वाचा love jihad : उत्तर प्रदेशातील ‘आफताब’नेही हिंदू युवतीचे तुकडे शेतात पुरले, पण दोन वर्षांनी असे घडले…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here