गुजरातची निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर विरोधी बाकावर बसण्यासाठी लढवली जाणार आहे

86

अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आहे. कॉंग्रेसने गुजरात जिंकण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण गुजरातच्या जनतेने २०१७ साली पुन्हा एकदा भाजपला कौल देऊन गांधी कुटुंबाला घरचा रस्ता दाखवला. २०१७ ची गुजरातची निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि चुरशीची होती. कॉंग्रेस जिंकेल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. तरी कॉंग्रेसने इथे चांगला लढा दिला. अर्थात यामागे राहुल गांधींचं कर्तृत्व नसून अहमद पटेल यांची ताकद होती.

( हेही वाचा : बॉयकॉट बॉलिवूडमुळे भाजपाला ‘हा’ फायदा होऊ शकतो…)

मोदी आणि पटेल हे जुने प्रतिस्पर्धी होते. पटेल हे सोनिया गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. याच निवडणूकीमध्ये कॉंग्रेसचा नैतिक विजय झाल्याचा साक्षात्कार अनेक पुरोगाम्यांना झाला होता. राहुल गांधी या निवडणूकीनंतर पुन्हा हीरो झाले होते. विजय मिळवता आला नसला तरी राहुल गांधींना नैतिक विजय मिळवता येतो हे नव्याने देशाला कळले होते. या नैतिक विजयात राहुल गांधी इतके गुंतले की पुढे त्यांनी निवडणूक हरण्याचा रेकॉर्ड केला.

राहुल गांधींच्या अपयशी नेतृत्वाखाली कॉंग्रेसने अनेक राज्ये घालवली आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर कॉंग्रेस नामशेष झाली आणि अगदी लहान पक्ष असलेला भाजप विरोधी पक्ष झाला तरी राहुल गांधी भाजप जिंकू शकला नाही म्हणून पेढे वाटत होते. म्हणजे त्यांना आपल्या विजयापेक्षा भाजपचा पराभव जास्त प्रिय आहे. येशू ख्रिस्ताने जर राहुल गांधींना वरदान मागायला सांगितलं तर गांधी भाजपची बरबादी मागतील.

आता गुजरातची निवडणूक जवळ आली आहे. कॉंग्रेसला इथे सत्ता स्थापन करायची आहे. पण आता अहमद पटेल यांची साथ नाही. त्यामुळे कॉंग्रेसला ही निवडणूक कठीण जाणार आहे. तरी गुजरातमधले कॉंग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण शक्ती लावून उतरतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पंजाबमध्ये यश मिळवल्यानंतर आप या पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. केजरीवाल सध्या गुजरात दौरा करत आहेत. आपला देखील इथे सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पडले आहे.

राहुल गांधीची अडचण अशी आहे की त्यांना निवडणूक जिंकायची इच्छा नाही तर भाजपला हरवायची इच्छा आहे. त्यामुळे राहुल गांधी विरोधी बाकावर बसायला केव्हाचे आतुर आहेत. आपला मात्र इथे विजय प्राप्त करायचा आहे. पण एक हिंदुत्ववादी पक्ष आणि समोर दोन सेक्युलर पक्ष यांच्याबरोबरच्या लढाईत हिंदुत्ववादी पक्ष बाजी मारेल असे वाटते. मला प्रश्न पडला आहे की विरोधी बाकावर कोण बसणार? आप की काँग्रेस? पंजाबमध्ये भाजपचं अस्तित्व नव्हतंच, बंगालमध्ये तर भाजपने जादूच केली. मात्र गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो मोदींचा किल्ला आहे. हा किल्ला शाबूत राखण्याचा मोदी स्वतः प्रयत्न करतील. त्यामुळे उरलेल्या दोन सेक्युलर पक्षांना विरोधी बाकासाठी निवडणूक लढवायची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.